Join us

...म्हणून संजय खापरे म्हणतोय ‘डोन्ट वरी हो जायेगा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:41 PM

Dont worry ho jayega: रुपेरी पडद्यावर कायम वावर असतानादेखील संजयने रंगमंच सोडलेला नाही. त्यामुळेच त्याचे अनेक नाटकं आजही चर्चिले जातात

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रंगमंच आणि रुपेरी पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे संजय खापरे(sanjay khapre). दमदार अभिनयशैलीच्या जोरावर संजयने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. रुपेरी पडद्यावर कायम वावर असतानादेखील संजयने रंगमंच सोडलेला नाही. त्यामुळेच त्याचे अनेक नाटकं आजही चर्चिले जातात. सध्या सोशल मीडियावर त्याच्या 'डोन्ट वरी हो जायेगा' या नाटकाची चर्चा रंगली आहे.

संजय खापरे दिग्दर्शित हे नाटक सध्या विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. सकारात्मक भावना मनात आणली तर आपलं काम सहज चांगलं होऊ शकतं. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे. प्रत्येक खडतर परिस्थितीत स्वतःला समजवत राहायचं... ‘डोन्ट वरी हो जायेगा’ कारण जिंकण्याची पहिली पायरी एक छोटी आशा असते. या नाटकाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची धुरा संजय खापरे यांनी सांभाळली आहे."अभिनय–दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका मी या नाटकासाठी करीत असून दिग्दर्शक म्हणून माझं हे दुसरं नाटक आहे. परिस्थिती पुढे हात न टेकवता तिला सडेतोड उत्तर देतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. हा कानमंत्र यातून सांगितला आहे. हा आशय हलक्या-फुलक्या रितीने मांडत मनोरंजनातून अंजन करण्यात आलं आहे. टेन्शन फ्री हे नाटक प्रेक्षक एन्जॉय करतील याची मला खात्री आहे", असं संजय खापरे म्हणाला.

दरम्यान, मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या संजय यांच्यासोबत या नाटकात सुपर्णा श्याम, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. राहुल पिंगळे यांची मूळ संकल्पना असून लेखन रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांचे आहे. नेपथ्य महेश धालवलकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. गीत ललित युवराज तर संगीत मितेश चिंदरकर यांचे आहे. 

टॅग्स :नाटकसेलिब्रिटी