Join us

झोक्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या गायिकेला ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे तिचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 18:39 IST

marathi singer: सध्या सोशल मीडियावर या गायिकेचा फोटो व्हायरल होत आहे.

आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार मंडळी कायम नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. यात बऱ्याचदा ते सोशल मीडियाचा आधार घेतात. ही कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील अनेक लहानमोठे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या अशाच एका मराठमोळ्या गायिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही काळापूर्वी ती बाली या ठिकाणी व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तेथील तिचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ही गायिका एका उंच झोक्यावर बसली असून जोरजोरात हवेत झोका घेत आहे. यावेळी तिचा फोटो पाठमोरा काढल्यामुळे ती नेमकी कोण आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून कार्तिकी गायकवाड आहे. काही महिन्यांपूर्वी ती पती रोनित पिसे याच्यासोबत बाली येथे फिरायला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरम्यान, या फोटोमध्ये कार्तिकीने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे. कार्तिकी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्प'च्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्यानंतर तिचं नशीब पालटून गेलं. कार्तिकी आज प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी