Join us

अभिनेत्यापेक्षा कमी नाही रोहित राऊतचा सख्खा भाऊ; सोशल मीडियावर होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:09 IST

Yugal raut: सध्या रोहितच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजे रोहित राऊत. आपल्या आवाजाच्या जोरावर रोहितने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.  त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.  परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याच्या भावाची चर्चा रंगली आहे.

रोहित जितका कलाविश्वात सक्रीय आहे तितकाच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे प्रोफेशनलसह तो पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांविषयीदेखील तो अपडेट देत असतो. सध्या त्याच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रोहितच्या भावाचं नाव युगल श्याम राऊत असं असून तो सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. युगलला फिरण्याची आवड असल्यामुळे तो कायम नवनवीन ठिकाणांना भेट देत असतो. इतकंच नाही तर त्याचं आणि रोहित-जुईलीचं खूप घट्ट नातं आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टमधून हे नातं दिसून येतं. 

टॅग्स :रोहित राऊतसेलिब्रिटीटेलिव्हिजन