मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे (Manasi Moghe) हिने नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार असल्याचे तिने सांगितले आहे. मानसीने मागील वर्षी अभिनेता सुर्या शर्मा(Surya Sharma)सोबत ७ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी तिने ते पालक होणार असल्याचे जाहीर केले आहे.
अभिनेत्री मानसीमोघेने तिचा नवरा सुर्या शर्मासोबत मॅटरनिटी फोटोशूट केले आहे. यात तिने व्हाइट रंगाचा वन पीस परिधान केला आहे तर सुर्याने व्हाइट शर्ट आणि डेनिम पॅण्ट घातली आहे. यात त्या दोघांनी न्युजपेपरसोबत फोटो काढलाय त्यात त्यांनी नवीन बाळ लवकर येणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी या फोटोशूटमध्ये सोनोग्राफीचादेखील फोटो शेअर केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, आम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक छोटा पाहुणा लवकरच आमच्या कुटुंबात सामील होत आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.
होतोय शुभेच्छांचा वर्षावअभिनेत्री मानसी मोघे आणि सुर्या शर्मा यांच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. काही सेलिब्रेटींनीदेखील या पोस्टवर कमेंट केली आहे. मौनी रॉयने लिहिले की, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी, पप्पा आणि एंजेल बेबी. तुमच्या पुढच्या सर्वात आनंदी आणि सर्वात अर्थपूर्ण प्रवासासाठी शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला खूप प्रेम. हरलीन सेठीने लिहिले की, याय..! खूप छान बातमी. तर काही कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वर्कफ्रंटअभिनेत्री मानसी मोघे हिने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही. तिने 'ख्वाबों के परिंदे' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तर सुर्या शर्मादेखील अभिनेता आहे. त्याने बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. यात अनदेखी, ये काली काली आँखे, हॉस्टेजेस आणि ब्राउन या सीरिजचा समावेश आहे.