Join us  

दाक्षिणात्य सिनेमा देवरामध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:41 PM

Devara Movie: साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा' हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि जान्हवी कपूर(Janhavi Kapoor)चा 'देवरा' (Devara Movie) हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता या सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे (Shruti Marathe). तिनेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे हिने इंस्टाग्रामवर डबिंग करतानाचा फोटो शेअर करत ती देवरामध्ये काम करत असल्याचे सांगितले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, डबिंग. देवरा सिनेमा. तिने हॅशटॅगमध्ये लिहिले की, हिंदी, तेलगू, देवरा. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ते या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

श्रुती मराठेने याआधी तमिळ चित्रपटात काम केलं आहे. आता तिला हा महत्वाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. तिची ज्युनिअर एनटीआरच्या सिनेमात तेही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत वर्णी लागली आहे. तसेच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान ज्युनियर एनटीआरच्या देवरा या चित्रपटातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहेत. देवरा या चित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरच्या सोबत असून सैफ या चित्रपटात एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केले असून अनिरुद्धचे संगीत आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

वर्कफ्रंट

श्रुती मराठेचा 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. हा सिनेमा प्रेक्षकांचा भलताच पसंतीस पडला आहे. शिवाय ती नवऱ्यासोबत मिळून मालिकांची निर्मितीही करते.

टॅग्स :श्रुती मराठेजान्हवी कपूरज्युनिअर एनटीआर