मराठी कलाविश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी लग्नाची गाठ बांधली आहे. त्यात आता प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ऐश्वर्या डोरले (Aishwarya Dorle) हिने अमेय मोहरीरसोबत गुपचूप लग्न केले आणि आता महिन्याभरानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मेहेंदी, हळदी सोहळ्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा विवाहसोहळा नागपूरमध्ये पार पडला होता.
ऐश्वर्या आणि अमेय यांनी लग्नानिमित्त गोड बातमी शेअर केली आहे. त्यात ते प्रेमाची व्याख्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रेम म्हणजे काय हे मला नेहमीच माहीत होते. आयुष्यातील नव्या रोमँटिक कादंबरी कथेमधील या पहिल्या पानाबद्दल धन्यवाद. धमाल ऍक्शन आणि खूप जास्त वळणांचा यात समावेश आहे. अगदी महिन्याभरा पूर्वीच्या दिवसाच्या या अतिवास्तव आठवणींचा सारांश यात जोडला गेला आहे. होय खरं आहे, माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुमच्या बालपणीच्या प्रियकराशी लग्न करण्याइतके दुसरे जगात काहीही सुंदर नाही. धन्यवाद देवा आणि हे घडवून आणले त्या प्रत्येकाचे. लग्नाची ही सर्व छायाचित्रे आनंद, हर्ष, प्रेम, उत्साह आणि उत्कंठतेने भरलेली आहेत. आम्ही आता कायमचे एकरूप झालो आहोत. आम्ही पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे याचा खूप आनंद होत आहे. मी तुम्हाला खात्री देते की आमचे एकमेकांवरील प्रेम इतके आहे की, आमचा लग्नाचा अल्बम कधीच काढावा लागणार नाही. अमेय मी तुमच्यासोबत प्रेम आणि आदरामुळे आपल्या प्रेमकथेचा एक नेत्रदीपक सीक्वल तयार करण्याची प्रतीक्षा करत आहे.
ऐश्वर्या डोरले ही मूळची नागपूरची. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या ऐश्वर्याला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगचे वेध लागले. यातूनच तिने महाराष्ट्र श्रावण क्वीन सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला. २०१९ साली मिस महाराष्ट्र श्रावण क्वीन नागपूर ही स्पर्धा तिने जिंकली. नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित गडकरी हा चरित्रपट बनवण्यात आला होता. ऐश्वर्या डोरलेने चरित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
युट्युब चॅनेलवर हा चरित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटानंतर ऐश्वर्या वेगवेगळ्या माध्यमातून मॉडेलिंग करताना दिसली. शाळेत असल्यापासूनच तिची अमेय मोहरीर सोबत मैत्री होती. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी प्रेमाचे नात्यात रूपांतर करायचे ठरवले. अमेय मोहरीर नागपूरचा, त्याने वकिलीचे शिक्षण घेतले असून बॉम्बे हाय कोर्ट येथे कार्यरत आहे.