Join us

मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराची घोषणा, प्रसाद ओक ठरला मानकरी; म्हणाला, 'मी वडिलांना...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 8:42 AM

मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी प्रसाद ओकला या विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची कालच घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी मराठी अभिनेता प्रसाद ओकला (Prasad Oak) विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रसादने पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत.

'धर्मवीर' सिनेमात त्याने केलेली आनंद दिघेंची भूमिका असो किंवा 'चंद्रमुखी' सिनेमाचं दिग्दर्शन असो प्रसादने कौतुकास्पद काम केले. या दोन्ही सिनेमांसाठी त्याला विविध पुरस्कार मिळाले. तर आता या विशेष पुरस्काराची घोषणा झाल्याने त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 

प्रसाद लिहितो,"अत्यंत आनंदाची बातमी या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार मला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीमचे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो."

मराठीतील इतर सेलिब्रिटींनी प्रसादचे कौतुक केले आहे. अमृता खानविलकर, सुबोध भावे, संकर्षण कऱ्हाडे,अभिजीत खांडकेकर, समीर चौघुले या कलाकारांनी प्रसादचे अभिनंदन केले आहे. 24 एप्रिल 2023 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतामराठी चित्रपट