ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांची फॉर्चुनर पंढरपुरजवळ ५० फूट खोल कालव्यात कोसळली. यामध्ये त्यांचा मृत्यु झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत.
रात्रीच्या सुमारास मीना देशमुख आणि त्यांचे नातेवाईक मोडलिंबकडुन पंढरपुरकडे येत होते. दरम्यान ५० फूट खोल दरीत फॉर्चुनर कोसळली. कारमध्ये त्यांची कन्या, नात आणि चालक होते. ते गंभीर जखमा झाले आहेत. अपघात बघताच गावातील नागरिकांनी मदतकार्य सुरु केले, रुग्णवाहिका बोलावली आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
५० फूट खोल कालव्यात ही गाडी कोसळली. मात्र कालव्यात उतरायला जागाच नव्हती, तसेच रात्र झाल्याने अंधार होता. यामुळे तात्काळ मदत मिळाली नाही, बचावकार्यात अडथळे आले. दोरीच्या साहाय्याने जखमींना वर ओढलं, मात्र मीना देशमुख यांचा जागीच मृत्यु झाल्याचे समजले.
हा कालवा पंढरपुर कुर्डुवाडी रस्त्याच्या बाजुला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले होते. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे हा पूल मृत्युचा सापळा बनला आहे अशा तक्रारी येत आहेत.