#MeeTooउषा जाधव पाठोपाठ कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीनेही केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:34 AM
गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगते आहे. आजपर्यंत अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी कास्टींग काऊचच्या बळी पडल्याचे ...
गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगते आहे.आजपर्यंत अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी कास्टींग काऊचच्या बळी पडल्याचे आरोप केले आहेत.मात्र यावर केवळ आरोप झाले आणि चर्चा रंगली. आता अनेक अभिनेत्री मोठ्या धाडसाने कास्टींग काऊच विरोधात बोलताना दिसतायेत.झगमगत्या दुनियेचं वास्तव काय आहे हे उघड करताना दिसतायेत. सिनेमात काम करण्यासाठी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचच्या अनेक अभिनेत्री बळी पडल्या आहेत.हॉलिवूड बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीही यापासून स्वतःला वाचवू शकली नाही.राधिका आपटे,उषा जाधव इतकेच नव्हे तर अलका कुबलपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी उघडपणे मांडल्या. आता त्याच अजून एका अभिनेत्रीनेही कास्टींग काऊचविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. ती अभिनेत्री आहे रेश्मा रामचंद्र.2016 साली रेश्माला अशाच प्रकारे कास्टींग काऊचचा सामना करावा लागला होता.चित्रपटातील भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड ठरली पण त्यानंतर या चित्रपटात काम करायचे असेल तर काही अपेक्षा पूर्व कराव्या लागतील असे तिला सांगण्यात आले.मात्र या गोष्टी रेश्माला कळताच तिने नकार दिला आणि संबंधीत व्यक्तीनेही तिला फोन करून सिनेमात घेऊ शकत नसल्याचे सांगत तुला काय करायचे ते कर अशी धमकीही दिली. हा प्रकरा घडल्यानंतर रेश्माने ही बाब उघडपणे सांगितली तेव्हा तिला अनेक टोमणेही ऐकावे लागले.काहींनी तर पब्लिसीटी स्टंट म्हणत तिच्यावर अनेक आरोपही केले.मात्र त्यावेळी तिच्या बाजुने उभे राहणाऱ्या लोकांचेही तिने आभार मानले आहेत.रेश्माने 'तुझं माझं ब्रेक अप' मालिकेअगोदर 'देहभान', 'ठष्ठ' अशा नाटकांतही भूमिका केल्या आहेत. गेल्या आठवड्यात बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान कास्टिंग काऊचबाबत विधानं करुन वादाच्या भोव-यात अडकल्यात.आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव हिने याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता.आपल्यालाही कास्टिंग काऊचची ऑफर देण्यात आली आणि आपला विनयभंग झाला होता अशी कबुली उषाने एका माहितीपटात दिल्याचे वृत्त मिड-डेने प्रसिद्ध केले होते.चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि तेही प्रस्थापितांकडून ही गोष्ट सामान्य असल्याचे उषाने म्हटले आहे.