Join us

मराठी अभिनेत्री मेघा धाडेची सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 09:52 IST

मराठी अभिनेत्रीने सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी खास पोस्ट लिहली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला. मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू केला; जो अजूनही सुरुच आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण सुधीर मुनगंटीवारांना शुभेच्छा देत आहेत. मराठी कलाकार मंडळींनी देखील सुधीर मुनगंटीवारांसाठी खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री मेघा धाडेने  ( Megha Dhade ) सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मेघा धाडेने सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिनं लिहलं, 'ज्यांच्या नावापुढे विकास पुरुष ही उपाधी अतिशय शोभून दिसते, जे वाळवंटातही नंदनवन खुलवू शकतात अशी प्रचंड क्षमता असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते आणि सांस्कृतिक, वनविभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. सुधीर भाऊ आपल्या कार्याचा ओघ हा कायम असाच सुरू असू दे, आपण कायम सुखात, आनंदात असू दे, आपली प्रकृती ही कायम ठणठणीत असू दे; जेणेकरून आपण घेतलेले लोकसेवेचे हे व्रत अखंड अविरत चालू राहील अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा'.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचासुधीर मुनगंटीवारना पाठिंबा असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी या कलाकारांकडून आवर्जून पोस्ट लिहिली जाते. या सेलिब्रिटींच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही सुधीर मुनगंटीवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :मेघा धाडेसुधीर मुनगंटीवारसेलिब्रिटी