Join us

Tamasha Live : सोनाली कुलकर्णीचा ‘तमाशा लाईव्ह’ बघण्याआधी, त्यावरचे हे भन्नाट मीम्स बघाच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:58 IST

Tamasha Live, Sonalee Kulkarni : गेल्या काही दिवसांपासून तमाशा लाईव्ह या सिनेमाची, या सिनेमातील गाण्यांची जोरदार चर्चा आहे आणि आता या चित्रपटावरच्या मीम्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावरचे भन्नाट मीम्स म्हणजे आणखी एक मनोरंजन. होय, हे मीम्स पाहताना अनेकांना हसू आवरत नाही. एखादा राजकीय मुद्दा, एखादा सिनेमा वा मालिका, त्यातील सीन्स, डायलॉग्स सगळ्यांवरचे मीम्स लोकांचं चांगलंच मनोरंजन करतात. सध्या असेच एका मराठी सिनेमावरचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. होय, सिनेमाचं नाव आहे तमाशा लाईव्ह . महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) ‘तमाशा लाईव्ह’  ( Tamasha Live) हा सिनेमा येत्या 15 जुलैला प्रदर्शित होतोय. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची, या सिनेमातील गाण्यांची जोरदार चर्चा आहे आणि आता या चित्रपटावरच्या मीम्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि सचित पाटील यांची मुख्य भूमिका असलेला संगीतातून कथा सांगणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाचे एक से बढकर एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.  हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...पाहुया तर काही भन्नाट मीम्स... सर तुम्हाला काहीही लागलं तर सांगा...

(सौजन्य -आम्ही Memekar)

 आई : अरे काळजी करु नकोस नाही सांगत मी बाबांना काहीच...

 वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकलेले कपडे एकमेकांना...

 पार्टीला गेल्यावर बिल भरताना...

 ये लिपस्टिक का मामला है...

जेव्हा सासूबाई जीन्स घालू नको बोलते...

 

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची निर्मिती अक्षय बदार्पूरकर यांनी केली आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसिनेमासोशल व्हायरल