लवकरच रसिकांना एक रसहस्यमय सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'मिरांडा हाऊस' असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर सस्पेन्स थ्रिलरचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. अवघ्या काही तासाच सिनेमाचा ट्रेलरला रसिकांची पसंती लाभली होती. हा सिनेमा नेहमीच्या सिनेमांपेक्षा नक्कीच वेगळा असणार हे तर ट्रेलर वरून लक्षात येतच अशा कमेंटस रसिकांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
बऱ्याच कारणांसाठी हा सिनेमा खास ठरत आहे. खूप दिवसांनी मराठी आणि त्यातही मिलिंद गुणाजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तसेच पल्लवी सुभाष आणि साईंकित कामात देखील या सिनेमामध्ये दिसणार आहे. विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साईंकित कामत ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. सध्या या सिनेमाचे हटक्या पद्धतीने प्रमोशन करण्यात येत आहे. या सिनेमाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. इतकेच काय तर सिनेमात व्यक्तिरेखेची नावं सुद्धा कुठेही सांगण्यात येत नाहीये.
हा ट्रेलर बघताना कलाकारांचा दमदार अभिनय, अर्थपूर्ण संवाद आणि ऑस्कर पुरस्कारप्राप्त रसूल पुकुट्टी यांचे पार्श्वसंगीत हे लक्षवेधून घेते. या सिनेमाचे आणखी एक वैशिट्य सिनेमाचे राजेंद्र तालकने दिग्दर्शन केेले आहे. राजेंद्र तालकने 'अ रेनी डे', 'सावरिया.कॉम', 'सावली' यांसारखे सिनेमा दिग्दर्शित केले आहे. त्यामुळे ह्या सिनेमामध्येसुद्धा रसिकांना नक्कीच काहीतरी वेगळे पाहायला मिळणार यात शंका नाही. 'मिरांडा हाऊस' या सिनेमाची निर्मिती आयरिस प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. हा सिनेमा येत्या १७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.