'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे. मिथिला लवकरच रेणूका शहाणेच्या त्रिभंगा चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती अभिनेत्री काजोलसोबत काम करताना दिसणार आहे.
मिथिला पालकर हिने फिल्मफेअर स्पॉटलाइटच्या आगामी भागात सहभाग घेतला होता. त्यावेळी तिने काजोलची मोठी चाहती असल्याचे सांगितले आहे. मिथिला पालकरचा नेटफ्लिक्सवर त्रिभंगा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातून रेणूका शहाणे दिग्दर्शनात पदार्पण करते आहे.
सुरूवातीला माझ्या मनावर थोडे दडपण होते पण त्यांनी मला तशी जाणीव करून दिली नाही. त्यांना सेटवर भेटताच मी बर्फासारखे वितळून गेली. त्या खूप हसतात. त्या सेटवर आल्या की उत्साही वातावरण असते. त्या मनापासून हसतात आणि मनमोकळेपणाने बोलतात. मला त्या खूप आवडतात, असे मिथिलाने सांगितले.