Join us

तुला नक्की काय करायचं होतं, डान्समुळे मिथिला पालकर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 1:06 PM

एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीला पालकरने दाखवून दिली आहे.

सेलिब्रेटी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यानुसार त्यांच्या खासगी आयुष्यात ते जे काही करतात त्यावर चाहत्यांचे प्रचंड लक्ष असते. कोणती गोष्ट त्यांच्या चाहत्यांना खटकेल हे सांगणेही कठिण त्यामुळे अनेकदा सेलिब्रेटींवर नेटीझन्स निशाणा साधत त्यांना ट्रोल करत असतात. 

 

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

'मुरांबा' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशायानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं.

मिथीला सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. फॅशनची उत्तम जाण मिथीलालाही आहे.मिथीला तिच्या एका डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिने तिचा भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ पाहून चाहते मात्र चांगलेच संभ्रात पडले आहे. हा डान्स पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे नेटीझन्सनेही तिला चांगेलच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 

कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नेहमीप्रमाणे मिथीला प्रचंड स्टायलिस दिसते आहे. एकीकडे तिची खिल्ली उडवली जात आहे तर दुसरीकडे तिच्या स्टाईलवरही चाहते फिदा होत आहेत.

 

मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. कप साँगच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.

टॅग्स :मिथिला पालकर