Join us

'बन ठन चली'वर मिथिला पालकरचा धमाकेदार डान्स, व्हिडीओला मिळाले १० लाखांहून जास्त व्ह्यूज

By गीतांजली | Updated: October 19, 2020 18:09 IST

अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मिथिलाचा 'बन ठन चली' या गाण्यावरचा डान्स केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या गाण्यात मिथिलाला निकोल कंसेसाओची साथ मिळाली आहे. सुखविंदर सिंग आणि सुनिधी चौहानच्या या गाण्यावर दोघी धमाकेदार डान्स करताना दिसतायेत. 2000 साली रिलीज झालेले हे गाणं हिट ठरले होते. 

मिथिलाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ''ही मुलगी कमालीची रॉकस्टार आहे. हिच्यासोबत हे गाणं प्लान केलं आणि दोन दिवसांत पूर्णदेखील झाले. स्टुडिओ, वेशभूषा, नृत्यदिग्दर्शन आणि पोहा. निकोल, आपल्याला हे बर्‍याच वेळा केलेच पाहिजे.''

इन्स्टाग्रामवर 3 दिवसांनी पूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओता आता पर्यंत 1.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.   मिथिला पालकरने इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

टॅग्स :मिथिला पालकर