Join us

मिथिला पालकरनं सोडलं दादरमधील आजी-आजोबांचं घर, यामागील खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:31 PM

अभिनेत्री मिथिला पालकर दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे राहते आहे.

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते. मात्र आता असे समजते आहे की तिने दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे राहते आहे. यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मिथिला पालकर एका प्रोजेक्टचे हैदराबादमध्ये शूटिंग करून मुंबईत परतली आहे. ती दादरमध्ये आपल्या आजी आजोबांसोबत राहते. मात्र आता ती वेगळ्या आपर्टमेंटमध्ये राहते आहे. तिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी आजोबांच्या काळजी पोटी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मिथिला पालकर म्हणाली की, ऑक्टोबर २०२० पासून मी काम करायला सुरूवात केली. मी घराच्या बाहेर जाताना खूप काळजी घेते. कामासाठी बाहेर पडायचे आहे तर आजी आजोबांसोबत न राहण्याचे ठरविले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले. या वर्षी मी हैदराबादमधील माझे शूटिंग संपविले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शूटिंग थांबवण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून परिस्थिती पाहून शूटिंग थांबवावी लागली. कारण बऱ्याच लोकांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

मिथिला पुढे म्हणाली की, मी आजी आजोबांपासून वॉकिंग डिस्टन्सवर एका अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्यासोबत राहण्यासाठी जोपर्यंत मला शंभर टक्के खात्री वाटत नाही, तोपर्यंत राहणार नाही. माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण मी अत्यंत जागरूक आहे. आम्ही जितकी काळजी घेऊ शकतो तितकी घेतो. पण ही अनपेक्षित परिस्थिती आहे. एक कलाकार आहे तर कॅमेऱ्यासमोर मास्क घालू शकत नाही, त्यामुळे धोका जास्त आहे.

मिथिलाच्या ९३ वर्षीय आजोबांची ऑगस्ट,२०२० ला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि दहा दिवस होम आइसोलेशनमध्ये ते बरे झाले होते. ती म्हणाली की, माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. जर मी त्यांना भेटायला गेले तरी मी मास्क घालून भेटते. तिथे मी विनाकारण जात नाही. त्यांना भेटल्यावर मिठी मारत नाही. त्यांच्याशी बोलताना अंतर ठेवून बोलते.

टॅग्स :मिथिला पालकरकोरोना वायरस बातम्या