दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. स्वराज्याची सुवर्णगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटींचा गल्ला जमवत, बॉक्स ऑफिसवर आपला दम दाखवला. खरं तर अगदी पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. पाठोपाठ या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने धूम केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या दमदार आवाजातील चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहुन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता राज ठाकरेंचा रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
झी स्टुडिओने हा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. यात राज ठाकरे ‘हर हर महादेव’ या चित्रपटासाठी आवाज रेकॉर्ड करताना दिसत आहेत. ‘सह्याद्रीच्या नजरेतून आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या बुलंद आवाजातून सादर होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या महापराक्रमाची गाथा ह्यहर हर महादेव’, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून राज ठाकरे यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
‘हर हर महादेव’ हा सिनेमा मराठीसह एकूण पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेने छत्रपतर शिवरायांची भूमिका साकारली आहे. अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री सायली संजीवने महाराणी सईबाई भोसले यांची तर अमृता खानविलकर हिने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका जिवंत केली आहे. हार्दिक जोशी आणि नितिश चव्हाण हेही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
संपूर्ण भारतात एकूण 400 चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे एकूण 1200 यो दाखवण्यात आले. सध्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.पहिल्या दिवशी 2.25 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसºया दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी 1 कोटी 36 लाखांची कमाई केली. तर तिसºया दिवशी 80 लाखांचा गल्ला जमवला.