जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोनीलिव्ह आणखी एक विचारशील मराठी चित्रपट 'कासव' सादर करत आहे. हा मूक संवेदनशील चित्रपट मानसिक आरोग्याचा विषय सुरेखरित्या सादर करतो. ६४व्या नॅशनल अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेल्या या हृदयस्पर्शी सोशल ड्रामाचे दिग्दर्शन (स्वर्गीय) सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने केले आहे. दु:खाच्या परस्पर भावनेला दाखवणारा चित्रपट 'कासव' आत्महत्या करताना वाचलेल्या व्यक्तीबाबत आहे. स्वत: नैराश्याचा सामना करत असलेल्या महिलेच्या देखरेखीअंतर्गत ही व्यक्ती असते. हा चित्रपट ८ ऑक्टोबरपासून सोनीलिव्हवर पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे कथानक नैराश्यामधून बरी होत असलेली रूग्ण जानकी कुलकर्णीच्या (इरावती हर्षे) प्रवासाला सादर करते. तिला एक तरूण अस्वस्थ किशोरवयीन मुलगा मानव (आलोक राजवाडे) भेटतो, जो त्याच्या मनातील समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे आत्महत्या करणार असतो. जानकी मानवला गोव्याला घेऊन जाते, जेथे ती ऑलिव्ह रिडली टर्टल्ससोबत संवाद साधत तिचा मित्र दत्ताभाऊला (मोहन आगाशे) मदत करत आहे. लवकरच, मानव तिच्या स्वत:च्या संवाद प्रकल्पाचा भाग बनतो. ती त्याला त्याच्या नैराश्यामधून बाहेर पडण्यामध्ये मदत करते, त्याची भिती समजून घेते, त्याला स्वत:चा मित्र व सह-पीडित मानते. आत्मशोधाच्या या प्रवासामध्ये दोन पीडित व्यक्तींना त्यांच्या सभोवती असलेल्या वर्दळीच्या विश्वामधून सुटका करून घेण्याचा मार्ग सापडतो.