'उनाड' चित्रपटातून या निर्मात्याचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 08:24 PM2019-12-12T20:24:43+5:302019-12-12T20:25:15+5:30
प्रसिद्ध निर्माता अजित अरोरा 'उनाड' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
३७७ ऍबनॉर्मलच्या या हिंदी वेब सीरिजच्या यशानंतर अजित अरोरा यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. उनाड हा चित्रपट आताच्या तरुणाईवर आधारित चित्रपट असून या चित्रपटाचे शूट कोकणच्या सुंदर परिसरामध्ये झाले आहे.
अजित अरोरा म्हणाले की, मराठी चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना मराठी सिनेमे त्याच्या विषयामुळे आणि दर्जामुळे आवडतात.
मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे सरकारने प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याचा जीआरसुद्धा काढला आहे आणि मराठी चित्रपट प्राईम टाईममध्ये दाखवणे बंधनकारक आहे. जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट पोहचेल आणि लोप पावत चाललेल्या मराठी संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल.
उनाडचे दिग्दर्शन प्रभावशाली आदित्य सरपोतदार यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अजित अरोरांच्या प्रोडक्शन हाउस "ऑरोरा प्रोडक्शन्सने" केले आहे. चित्रपटाचे पहिले शेड्युल संपले आहे आणि दुसऱ्या शेड्युलची सुरुवात झाली आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी आशा आहे.