Join us  

प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट असणार हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 2:26 PM

 प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं ...

 प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपºयातलं लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल? या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडीओजचा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे  'ती सध्या काय करते'. या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे निमार्ते झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या  प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हाअनुराग इतकाच तन्वीचा चित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माज्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे. 'ती सध्या काय करते' या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी याला अपवाद नाहीत. ती सध्या..जितकी या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी, आर्या आंबेकर, तेजश्री प्रधान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.  तर सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी या कलाकारांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ६ जानेवारीला पाहायला मिळणार आहे.