Mrinal Kulkarni on Women: मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वाची 'सोनपरी' म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. गेली वर्षानुवर्षे नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेर मृणाल या लोकप्रिय आहेत. नुकतंच मृणाल कुलकर्णींनी 'आरपारला' दिलेल्या मुलाखतीत आजच्या सक्षम महिलांबद्दल खूप सुंदर मतं मांडली आहेत. 'वुमन की बात' या सेगमेंटमध्ये मृणाल यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॅमेऱ्यामागे असलेल्या महिलांच्या सहभागाबद्दल भाष्य केलं.
"स्त्री दिग्दर्शिका कमी का असतात, या प्रश्नावर उत्तर देताना मृणाला म्हणाल्या, "कमी असतात असं मला वाटतं नाही. कारण, मराठीत नाही म्हटलं तरी जवळपास १० दिग्दर्शिका आहेत. हिंदीमध्येही प्रचंड महिला दिग्दर्शिका आहेत. मला वाटतं जे प्रमाण हिंदी आणि मराठीत आहे, तेच जगभरात आहे. आता ते वाढतं चाललं आहे. अनेक महिला अप्रतिम काम करतात. मला आनंद या गोष्टींचा आहे की आधी महिला कॅमेऱ्यासमोरचं होत्या. पण, आता कॅमेऱ्यामागे महिलांचा सहभाग वाढला आहे. अगदी कॅमेरा वुमनपासून गीतकार, संवाद लेखन, गाणं लिहणाऱ्या, म्युझीक देणाऱ्या महिला आहेत. म्हणजे आता पुर्वीसारखं गायिका आणि नायिका असं राहिलेलं नाही. बायका चॅनल हेड आता आहेत. हे सर्व फार कौतुकास्पद आहे".
पुढे त्या म्हणाल्या, "एक गोष्ट अशी आहे, म्हणजे असं मला वाटतं. इतराचं मत वेगळं असू शकतं. अजुनही स्रीला सगळं केल्याशिवाय आनंद होतं नाही. म्हणजे पुरुष हे कसे फक्त करिअरवर लक्ष केंद्रीत करतात. पण, बायकांना मात्र सगळं करायचं असतं. मला वाटतं पुरुषांपेक्षा महिला जास्त परिपुर्ण आहेत. पुरुष हा एकांगी आहे. या पीढीतील मुलींना प्रवास करायचा आहे. त्यांना या सर्व गोष्टींसाठी वेळ देता येतोय. म्हणून माणूस म्हणून बायका जास्त इंटरेस्टिंग आहेत, असं मला वाटतं. मुलींना रांगोळी काढायला ही मजा येते, मग त्या बाहेर लढायाही करत असतील".