Join us  

मृणाल ठाकूरने 'या' मराठी सिनेमातून केली अभिनयाला सुरुवात; आज गाजवतेय साऊथ अन् बॉलिवूड इंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 12:53 PM

३१ वर्षांची झाली मृणाल ठाकूर, 'सीतारामम' सिनेमातून जिंकलं प्रेक्षकांचं मन; पण तिचा मराठी सिनेमा कोणता?

'सीतारामम' सिनेमामधून सर्वांना आपल्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) आज वाढदिवस. आज ती ३१ वर्षांची झाली. मूळची धुळ्याची असलेली मृणाल आधी हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करायची. नंतर तिने साऊथमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण तुम्हाला माहितीये का मृणालने मराठी सिनेमातही भूमिका साकारली आहे. धुळ्याची असल्याने तिला उत्तम मराठी बोलताही येतं. कोणता आहे तो सिनेमा?

'कुमकुम भाग्य' या गाजलेल्या हिंदी मालिकेतून मृणाल ठाकूर प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र तिने एका मराठी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2014 साली आलेल्या 'विटी दांडू' सिनेमात ती झळकली. यामध्ये तिने संध्या ही भूमिका साकारली होती. त्याचवर्षी ती 'सुराज्य' या आणखी एका मराठी सिनेमात दिसली. यामध्ये ती डॉ स्वप्ना या भूमिकेत दिसली. दोन्ही सिनेमे हिट झाले. मृणालच्या अभिनयचंही कौतुक झालं. 

नंतर मृणालने 2918 साली 'लव्ह सोनिया' या आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकली. यासाठी ती कोलकाता येथे राहिली होती. या सिनेमाचं जागतिक स्तरावर कौतुक झालं होतं पण बॉक्सऑफिसवर सिनेमा आपटला होता. 2019 साली मृणालने हृतिक रोशनच्या 'सुपर 30' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. याशिवाय साऊथमध्येही तिला 'सीतारामम' मुळे चांगलंच यश मिळालं.

मृणालचा 'द फॅमिली स्टार'  आणि  'कल्की' सिनेमे लागोपाठ रिलीज झाले. आता ती आगामी 'विश्वंभरा' सिनेमात झळकणार आहे. यामध्ये चिरंजीवी, तृषा कृष्णन यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडमराठी चित्रपटमराठी अभिनेता