Join us

मृणाल ठाकूरला आदिनाथचं कौतुक! 'पाणी' सिनेमा पाहून भारावली, म्हणते- "एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:40 IST

'पाणी' सिनेमा पाहून मृणाल भारावून गेली आहे. तिने आदिनाथचं कौतुक केलं आहे. 

आदिनाथ कोठारे अभिनित आणि दिग्दर्शित 'पाणी' हा सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. मराठवाड्यातील गावात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या आणि  त्यावर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कहाणी यातून मांडण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकतंच मृणाल ठाकूरने आदिनाथचा हा सिनेमा पाहिला. 'पाणी' सिनेमा पाहून मृणाल भारावून गेली आहे. तिने आदिनाथचं कौतुक केलं आहे. 

'पाणी' सिनेमा पाहिल्यानंतर मृणालने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमधून तिने आदिनाथ कोठारेच्या कामाला दाद दिली आहे. तर सिनेमात असलेल्या सुबोध भावे, ऋचा वैद्य यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. "आदिनाथ पाणी सिनेमासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तू अतुलनीय झलक दाखवली आहेस. राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही पात्र आहेत. प्रियांका चोप्रा कथानक सांगण्यासाठी असलेली तुझी आवड आणि समाजात बदल घडवून आणणाऱ्या सिनेमांची निर्मिती करणे याचं मला नेहमी कौतुक वाटतं. तू एक खरी लीडर आहेस. माझा नेहमी आदर्श बनण्याबद्दल आभारी आहे. सुबोध भावे, ऋचा वैद्य आणि संपू्र्ण टीमचं अभिनंदन", असं मृणालने म्हटलं आहे. 

दरम्यान, १८ ऑक्टोबरला 'पाणी' हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 'पाणी'मध्ये आदिनाथसोबतच रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा उपलब्ध आहे. 

टॅग्स :आदिनाथ कोठारेमृणाल ठाकूरसिनेमा