गर्भ चित्रपटाचा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2016 9:25 AM
अलीकडच्या काळात मराठी सिनेमा अधिकाधिक आशयघन होताना दिसतोय. समाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ...
अलीकडच्या काळात मराठी सिनेमा अधिकाधिक आशयघन होताना दिसतोय. समाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब आपल्याला सध्याच्या मराठी चित्रपटात पहायला मिळातायेत. मराठी प्रेक्षकांच्या याच पसंतीचा विचार करीत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याच्या उदेश्याने ‘श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ ही निर्मिती संस्था व राजेंद्र आटोळे यांनी ‘गर्भ’ या मराठी कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली आहे. सुभाष घोरपडे दिग्दर्शित या सिनेमाचा मुहूर्त नुकताच गीतध्वनीमुद्रणाने करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. सिया पाटील, किशोरी शहाणे, अनंत जोग, यतीन कार्येकर हे कलाकार ‘गर्भ’ चित्रपटात काम करीत असून आरजे दिलीप या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करताहेत. चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे.अरुण कुलकर्णी लिखित यातील गीतांना अशोक वायंगणकर यांनी संगीत दिलंय. वैशाली सामंत सोबत सिनेमातील इतर गीतांसाठी स्वप्नील बांदोडकर, वैशाली माडे, नेहा राजपाल यांचा स्वरसाज लाभणार आहे.‘