नवा 'आधार'चा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:05 PM2018-08-20T13:05:43+5:302018-08-20T13:07:26+5:30
जिवनात प्रत्येकाला आधार हा हवा असतो, मग तो कुणाचाही असो, याच आधाराच सहाय्य घेऊन काहीजण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात तर काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात.
जिवनात प्रत्येकाला आधार हा हवा असतो, मग तो कुणाचाही असो, याच आधाराच सहाय्य घेऊन काहीजण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात तर काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात. अशाच एका एकमेकांचा आधार घेऊन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचा आशय घेऊन जनागोविंद पिक्चर्सच्या बॅनरखाली नवा आधार या निव्वळ कौटुंबिक, संवदेनशील आणि भावनिक विषय असलेल्या चित्रपटाचा मुहूर्त भायंदर येथे पार पडला. यावेळी निर्मात्या प्रभा सुर्वे, दिग्दर्शक मल्हार माणिक, कॅमेरामन के. अरविंद, अभिनेता निलेश इंदू, अश्विन पखाले, कार्यकारी निर्माते कृष्णा शेलार तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर निर्मात्या व दिग्दर्शकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .
नवा आधार ची कथा सत्य घटनेवर आधारित आहे असे लेखक व दिग्दर्शक मल्हार माणिक यांनी सांगितले. १९८० च्या दशकात अशा असाव्या सुना या चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण केलेल्या मल्हार माणिक याना या सिनेसृष्टीत बराच मोठा गॅप घ्यावा लागला. आपल्या या ३८ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर ते आता दिग्दर्शक म्हणून येत आहे. निर्मात्या प्रभा सुर्वे यांना लेखक माणिक यांचा हा विषय मला आवडला. अशी घटना प्रत्येक कुटुंबात घडत असते. प्रत्यक्ष जीवनात प्रत्येकाने एकमेकांचा आधार घेऊनच पुढे जायला पाहिजे. खूप वर्षा पूर्वी आमच्या कुटुंबाचे या चित्रपटसृष्टीशी अगदी जवळचे संबंध होते . खूप जुन्या आठवणी या माझ्या चित्रपट निर्मिती मुले जागृत झाल्या आहेत. असे प्रभाजींनी सांगितले. चित्रपटात एकूण चार गाणी असून न्यानराज न्यानेश , अरुण धवनकर, विशाल वाघ यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अरुण धवनकर यांनी संगीत दिले आहे. गायिका कविता निकम व गायक अण्णा सुरवडे या गीतांना आवाज दिला आहे. अनुभवी व बुजुर्ग छायाचित्रकार के. अरविंद, कला दिग्दर्शक वासुदेव खेडेकर, मास्टर संतोष यांची साहसदृशे यात पाहायला मिळणार आहेत. नवा आधार या चित्रपटात निलेश इंदू हा उमदा कलाकार प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. सोबत जयराज नायर, मेघा, अलका, विनोद देशमुख, धनराज नाईक यांच्या भूमिका आहेत. बाकी कलाकार व तंत्रन्या यांची निवड होताच कराडी गाव, डहाणू पालघर येथे चित्रीकरणांस सुरवात होईल.