सध्या सगळीकडे 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. परेश मोकाशी (Paresh Mokashi) दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) लिखित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे (Mukta Barve), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), मायरा वायकुळ (Myra Vaikul), सुप्रिया पाठारे (Supriya Pathare), सुकन्या मोने (Sukanya Mone), सारंग साठ्ये (Sarang Sathye), आशा ज्ञाते (Asha Dnyate) आणि शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut) हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. दरम्यान चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिने मुक्ता बर्वेचा एक किस्सा सांगितले. म्हणे मुक्ता बर्वेने या सिनेमासाठी कोणतेही मानधन घेणार नसल्याचे जाहीर केले होते.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मुक्ताबद्दल सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून मुक्ता मला खूप आवडते. तिने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्यानंतर तिचे पहिले वाक्य होतं की मला काहीही देऊ नकोस. मला शून्य मानधन दे. माझ्यावर जे पैसे खर्च होणार आहेत. ते तू मेकअप, हेअर्स आणि प्रॉडक्टवर खर्च कर. हे किती छान आहे.
तेव्हा खरेच खूप अभिमान वाटतो...हल्लीच्या काळात हिच्यासारखी अभिनेत्री जेव्हा असे म्हणते तेव्हा खरेच खूप अभिमान वाटतो. पुढच्या सिनेमात माझ्याकडे एवढे पैसे यावेत की अभिनेत्री म्हणून नाही तर पार्टनर म्हणून मी तिला सामील करू शकेन, अशी आशा मधुगंधाने यावेळी व्यक्त केली.
मुक्ता भारतीय सिनेइंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्री
चित्रपटाबद्दल बोलताना मधुगंधा म्हणाली की, नाच गं घुमामध्ये मुक्ताने अप्रतिम काम केले आहे. ती भारतीय सिनेइंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्री आहे. सिनेमात नम्रता आणि मुक्ताची केमिस्ट्री स्क्रीनवर पाहणे एक ट्रीट आहे. तसेच सारंग आणि मुक्ता या जोडप्यांचे कॉम्बिनेशनपण खूप सुंदर दिसते आहे.