Join us  

थिएटर गाजवल्यानंतर 'नाच गं घुमा' OTTवर झाला रिलीज! कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:05 AM

थिएटरमध्ये बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर दिल्यानंतर आता 'नाच गं घुमा' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेला 'नाच गं घुमा' हा मराठी सिनेमा १ मे रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. घरातील कामवाली बाईचं विश्व दाखवणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत होते. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जवळपास २७ कोटींचा बिझनेस केला. थिएटर गाजवल्यानंतर आता 'नाच गं घुमा' ओटीटी गाजवण्यास सज्ज झाला आहे. 

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली होती. प्रदर्शनाआधीच सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 'नाच गं घुमा' हे टायटल साँग प्रचंड हिट ठरलं. थिएटरमध्ये बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर दिल्यानंतर आता नाच गं घुमा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी चॅनेलवर 'नाच गं घुमा' सिनेमा नुकताच रिलीज करण्यात आला. त्यामुळे आता घरबसल्या प्रेक्षकांना प्राईम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येणार आहे. 

'नाच गं घुमा' सिनेमात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्याबरोबर सारंग साठ्ये, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बालकलाकार मायरा वायकूळदेखील या सिनेमात झळकली आहे. स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत हिने या सिनेमाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेसिनेमासेलिब्रिटीमराठी अभिनेता