Join us  

Mukta Barve : भाग मुक्ता भाग...! ‘ Y’ सिनेमाचा हा मजेशीर मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 6:05 PM

Mukta Barve starrer Y marathi movie : अंगावर काटा आणणाऱ्या थरारक 'वाय' ची कॅमेऱ्यामागची धमाल...तुमच्यासाठी हे खास मेकिंग...

Mukta Barve starrer Y marathi movie : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या (Mukta Barve) ‘वाय’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याआधी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘Y’चं उत्कंठावर्धक प्रमोशन, त्याचे थरारक टीझर आणि दमदार ट्रेलर पाहून  या चित्रपटाबद्दलचं कुतूहल वाढलं आहे. मुक्तासोबत प्राजक्ता माळी, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आदी कलाकार या सिनेमात आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आशुतोष म्हणजे ही भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धनही (Omkar Govardhan) या चित्रपटात आहे. ‘वाय’च्या टीझर आणि ट्रेलरची जबरदस्त चर्चा झाली. पण तूर्तास चर्चा आहे ती या चित्रपटाच्या एका मेकिंग व्हिडीओची.

होय, मुक्ताने तिच्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचा एक मजेशीर मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्यासोबत ओमकार गोवर्धन दिसतो.  ‘अंगावर काटा आणणाऱ्या थरारक 'वाय' ची कॅमेऱ्यामागची धमाल... तुमच्यासाठी हे खास मेकिंग..’ अशा कॅप्शनसह मुक्ताने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

यात मुक्ता व ओमकार दोघंही पळताना दिसत आहेत. खरं तर हा सिनेमातील एक सीन आहे. हा सीन करण्याचं मजेशीर कारण मुक्ताने सांगितलं आहे. ‘मी व्यायामाशिवाय सिनेमा करणार नाही, असं त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी हा एक सीन सिनेमात ठेवला. रोज आम्ही हा एकच व्यायामाचा सीन करतो,’असं मुक्ता हसत हसत सांगताना दिसतेय. ओमकारने या सीनला ‘भाग मुक्ता भाग’ असं नाव दिलं आहे. ते का? तर त्यासाठी तुम्हाला हा मेकिंग व्हिडीओ पाहावा लागेल.

‘वाय’ हा चित्रपट येत्या 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही ‘वाय’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेसिनेमा