Join us

मुक्ता बर्वेने केला अनोखा ३१ डिसेंबर साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 2:28 PM

जेव्हा सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात साजरा करत होते. त्यावेळी मात्र अभिनेत्री मुक्ता बर्वे एक अनोखा उपक्रम राबवत होती. तिच्यासोबत यावेळी तिच्या कोडमंत्र नाटकाची पूर्ण टीमदेखील होती. कोडमंत्र या नाटकाच्या टीमने अत्यंत अनोख्या पध्दतीने सरत्या वर्षाला निरोप दिला आहे.

काल सर्वानीच मोठया उत्साहात सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. त्याचप्रमाणे २०१७ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळयांनीच विविध पार्टी आणि कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र जेव्हा सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात साजरा करत होते. त्यावेळी मात्र अभिनेत्री मुक्ता बर्वे एक अनोखा उपक्रम राबवत होती. तिच्यासोबत यावेळी तिच्या कोडमंत्र नाटकाची पूर्ण टीमदेखील होती. कोडमंत्र या नाटकाच्या टीमने अत्यंत अनोख्या पध्दतीने सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. कारण मुक्ताने नुकताच सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ती आपल्या या व्हिडीओच्या माध्यमातून सांगते, आपण सर्वजण मोठया उत्साहात ३१ डिसेंबर साजरा करतो. मात्र जनतेचे रक्षण करणारे पोलिस मात्र आपल्या कामावर असतात. ते रस्त्यावर थांबून आपल्या कामाची जबाबदारी पार पाडत असतात. म्हणून आमच्या संपूर्ण टीमने यावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांना चहा, बिस्कीट आणि पाणी दिले. अशा अनोख्या पध्दतीने आम्ही ३१ डिसेंबर साजरा केला. तर अजय पुरकर सांगतात, प्रत्येक वर्षी आपण पार्टी वगैरे करून ३१ डिसेंबर साजरा करतो. मात्र यावेळी वेगळया पध्दतीने सरत्या वर्षाला निरोप देण्याची ही कल्पनी सुचली. कारण पोलिस सतरा अठरा तास काम करत असतात. मात्र त्यांच्यासाठी चहा किंवा पाणीची कुठेच सोय केलेली नसते. त्यामुळे आमच्या कोडमंत्र टीमने असा हा उपक्रम राबवत पोलिस मित्रांना अनोख्या पध्दतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुक्ताने यापूर्वी जोगवा, पुणे मुंबई पुणे, डबलसीट असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.