Join us

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या हस्ते 'लूज कंट्रोल' चे दिमाखदार सोहळ्यात म्युझिक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 3:54 AM

नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी 'लूज कंट्रोल' हा धमाल मजेदार सिनेमा सज्ज झालाय.नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च बॉलिवूड अभिनेत्री ...

नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी 'लूज कंट्रोल' हा धमाल मजेदार सिनेमा सज्ज झालाय.नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी अमिषाने तिचं मराठी कनेक्शनही सांगितलं.तिने सांगितले की, 'मी एकाबाजूने महाराष्ट्रीयनच आहे.कारण माझी आजी पुण्यातील गोखले. बालपणी पुण्यात जायची तेव्हा अनेक मराठी नाटक मी आजीसोबत पाहिली आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे ऑल टाईम फेव्हरेट कलाकार आहेत.अजूनही मला जसा वेळ मिळतो मी मराठी सिनेमे बघते.इतकच नाहीतर माझ्या घरी अनेक मराठी सिनेमाच्या डीव्हीडी कलेक्शन आहेत'.यावेळी तिने 'लूज कंट्रोल' सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.तसेच हा सिनेमा हिंदीतही बनवण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.प्रेम झांगियानी प्रस्तुत आणि अजय सिंग दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.अजित साटम,इनामदार रियाझ, जिग्नेश पटेल,साकीब शेख,मिहीर भट, यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे.या धमाल सिनेमात मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम,शशिकांत केरकर,कुशल बद्रिके,शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. अजय सिंग  यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे. तर संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत.संगीत रोहित नागभीडे आणि मिहीर भट यांनी दिलंय.संगीतकार रोहित नागभिडे यांनी या म्युझिक लॉन्च सोहळ्यात पुण्यातील 80 वर्ष जुन्या प्रसिद्ध प्रभात बँडमधील सदस्यांचा सत्कार केला.या सिनेमातील 'सोनू' या गाण्यात प्रभात बँडने सादरीकरण केलंय. हे गाणं या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाणं ठरलं असून प्रेक्षकांचा या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.पार्श्वसंगीत आशिष यांनी दिलंय. तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर यांनी केलंय.सिनेमाचं संकलन उज्वल चंद्रा यांनी केलंय.सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केली आहेत.