Join us

संगीत मार्तंडांची सजली मैफील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2016 4:00 PM

शीतल गारवा...अन सप्तसूरांचे चांदणे...अशा मनमोहक आसमंतात मेवातीघराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांची अविस्मरणीयमैफिलसजली. दोन वर्षांपासून रसिकांशी ...

शीतल गारवा...अन सप्तसूरांचे चांदणे...अशा मनमोहक आसमंतात मेवातीघराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांची अविस्मरणीयमैफिलसजली. दोन वर्षांपासून रसिकांशी सांगीतिक दुरावा निर्माण झालेल्यात्यांच्या  स्वरांनी कळससाध्य गाठत एका परमोच्च आनंदाची अनुभूती रसिकांनादिली..ओम नमो वासुदेवाय भगवते’ या भजनातून  मैफिलीला अनोखा स्वरसाज चढलाआणि रसिकांना ब्रम्हानंदी टाळी लागली.महोत्सवाच्या उत्तरार्धात रंग भरले ते पंडित जसराजांच्या स्वराभिषेकाने.आवाजातील चढउतार, स्वरांवरची जबरदस्त हुकूमत, उत्तम आलापी अशावैशिष्टयातून सादर झालेल्या  त्यांच्या गायनाने महोत्सवाला एक वेगळीचउंची प्राप्त झाली. महोत्सवात दोन वर्षांपासून त्यांचे म्हणावे तसेआनंदानुभूती देणारे गायन झाले नव्हते, स्वरमंचावर उपस्थित असूनहीशिष्यांच्या सादरीकरणातून त्यांची मैफिल रंगत होती, परंतु त्यांचा आवाजऐकण्यासाठी कानसेन आतूर झाले होते, यंदा तो मणिकांचन योग जुळून आला. ’जयहो’ चे सूर आसमंतात गुंजले आणि रसिकांच्या हदयाचा ठोका चुकला. जोग रागानेमैफिलीस प्रारंभ करीत घट अंगना, राम को राम बनाया तुने या बंदिशी त्यांनीखुलविल्या.  ओम नमो भगवते वासुदेवाय या भजनाने त्यांनी मैफिलीची सांगताकेली.त्यांना हार्मोनिअमवर मुकुंद पेटकर, तबल्यावर केदार पंडित,मृदुंगावर श्रीधर पार्थसारथी, तानपु-यावर रतनमोहन शर्मा, अंकिता जोशी,सुरेश पत्की, सिमांतिनी ठकार आणि संदीप रानडे यांनी साथसंगत केली.पंडित जसराज यांच्या सादरीकरणापूर्वी मंजिरी असनारे-केळकर यांचे बहारदारगायन झाले.  झिंझोटी रागाचे सौंदर्य उलगडत तीन बंदीशी त्यांनी खुलविल्या.शिवशांकाराची आराधना करणा-या महादेव विश्वंभर  जयजुट, हे शिव शंकर आणि हरहर शंकर या रचना सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले. उत्तम सादरीकरणातूनस्वरांचे एकेक पदर उलगडत त्यांनी आसमंतात चैतन्य निर्माण केले, त्यानंतरपरज रागातील अखिया मोरी लागन ही विलंबित एकतालातील बंदिश त्यांनी सादरकेली.  या पंढरीचे सुख पाहाता या अभंगाने त्यांनी भक्तीमय वातावरणाचीनिर्मिती करीत मैफिलीचा शेवट केला.  त्यांना माऊली टाकळ कर यांनी टाळेवर,सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनिअँवर, उत्पल दत्त यांनी तबल्यावर तर देवकीनवधारे आणि अमृता मोगल यांनी तानापुर्यावर साथसंगत केली.