Join us

इटालियन लेखिकेचे पत्र “फ्रॉम युअर फ्युचर”च्या माध्यमातून मुक्ता बर्वेने सांगितले कोरोनाबद्दलचे एक भयावह सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 11:40 AM

मेलँड्री ह्या गेले तीन आठवडे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम (इटलीची राजधानी) शहरात लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त आहेत.

कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले आहेत. येथे आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. दररोज लोकांचा मृत्यू होत आहे.शनिवारीही या विषाणूमुळे ६८१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे इटलीमधील शहरं आज बकाल झाली आहेत, स्मशानभूमीत मृतांसाठीदेखील  जागा  राहिली नाही संसर्ग वाढल्यानंतर स्मशानभूमीची क्षमता कमी पडते. सार्वजनिक ठिकाणी पार्थिवांना तात्पुरत्या स्वरूपात दफन करण्याच्या योजनेवर अधिकारी काम करत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून कसा बचाव करायचा यासाठीच प्रयत्न करताना लोक दिसतात. प्रख्यात इटालियन लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री यांनी यावर एक पत्र जाहिर केले. हे सर्व कधी थांबेल? या विचाराने मेलँड्री यांच्या मनात काहूर उठतेय.  इटलीतील सद्यपरिस्थीती आणि नंतर भारताचीही होणारी स्थिती यांत काही अंतर राहणार नाही याबाबतची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

मेलँड्री ह्या गेले तीन आठवडे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम (इटलीची राजधानी) शहरात लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त आहेत. अशात त्याने सावधगीरीचा इशारा म्हणून एक पत्र लिहीले आहे. सर्व युरोपीयन रहिवाश्यांना उद्देशून “फ्रॉम युअर फ्युचर” अर्थात ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ या नावाचं हे पत्र आहे, हे पत्र जगात अनेक वृत्तपत्रांमध्ये विवीध भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या काळात युरोपला कुठल्या भावनिक प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते याचे स्वअनुभवावरून कथन केले आहे.

भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिति लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीने ही तितकेच महत्वाचे असल्यामुळे मुक्ता बर्वेने हे पत्र रसिकांच्या समोर मांडले आहे.  या पत्राच्या माध्यमातून कोरोनामुळे भारताची कधी इटली होईल हे सांगता येत नाही त्यामुळे वेळीच सावध होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. इटलीमधील परिस्थितीच्या रोज बातम्या आपण ऐकतोय मात्र यांतून किती बोध घेतोय यावर जरा शंकाच व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे चीन, इटलीच नाहीतर सर्वात बलाढ्या म्हणून ओळखला जाणारा देश अमेरिकेने तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आत्ताच हार मानली आहे. कोरोना हा किती धोकादायक आहे  या समस्येला अमेरिकेच्या सरकारने गांभीर्याने घेतले नाही. न्यूयॉर्क व न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या बहुसंख्य भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी नाोकऱ्या गमावल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये दररोज लोकांचा मृत्यू होत आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस