Join us

"मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई", कान्समध्ये छाया कदमची ए. आर. रहमानसोबत झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:09 IST

Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम हिने इंस्टाग्राम प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानसोबतचा फोटो शेअर केला आहे.

सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हल(Cannes Film Festival)ची जोरदार चर्चा सुरु आहे. १४ मे रोजी सुरु झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटी, मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते. कान्समध्ये बऱ्याचदा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या हटके लूकमुळे चर्चेत असतात. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर असतात. यंदा मराठमोळी अभिनेत्री छाया कदम(Chhaya Kadam)नेही या महोत्सवात सहभाग घेतला होता आणि आईच्या साडीत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. तसेच तिने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

अभिनेत्री छाया कदम हिने इंस्टाग्राम प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने ही भेट होणे आणि निवांत अर्धा तास गप्पा मारत फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरत फिरत शेवटी एक सेल्फी होणे म्हणजे, ‘इन बहारों में दिल की कली खिल गई मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई ‘ 

अभिनेत्री छाया कदमला कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष बाब म्हणजे यावेळी ती एकटी महोत्सवात सहभागी झाली नव्हती. तर, तिला या प्रवासात प्रेमाची, मायेची साथ मिळाली. त्या चक्क त्यांच्या आईची साडी नेसून कान्सच्या रेडकार्पेटवर गेली होती. फोटो शेअर करत तिने लिहिले की, आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले....पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलसिनेमासेलिब्रिटी