Join us  

"माझं रक्त खवळतंय..", प्रिया बापटची बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 2:14 PM

Priya Bapat on Badlapur Case : अभिनेत्री प्रिया बापट हिनेदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Priya Bapat on Badlapur Case : बदलापूर येथील एका प्रतिष्ठीत शाळेतील दोन चार वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. त्यांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाउन या दोन्ही महामार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. या घटनेवर वेगवेगळ्या स्तरातील दिग्गज व्यक्तींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान सिनेविश्वातील कलाकारांनीदेखील या घटनेवर संताप व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापट हिनेदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रिया बापटने घटनेची पोस्ट शेअर करत लिहिले की, माझं रक्त खवळतंय. हे कोणत्याही एका व्यवसायाबद्दल नाही. हे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल आहे.

या पोस्टमध्ये तिने बदलापूर लैंगिक अत्याचाराबद्दल लिहिले आहे. त्यात लिहिलंय की, मुंबई बदलापूरमधील एका शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिंक अत्याचार झाला आहे. हे कृत्य शाळेतील कर्मचाऱ्याने केले आहे जो टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करतो. तो आरोपी बदलापूर पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि त्या ४ वर्षांच्या मुली हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ही घटना १३ ऑगस्ट, २०२४ रोजी घडली आहे. आम्हाला न्याय हवाय.

टॅग्स :प्रिया बापटबदलापूरगुन्हेगारी