Join us

"बाबूजींच्या अफाट कार्याला माझा सादर नमस्कार", विभावरी देशपांडेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 2:10 PM

Swaragandharva Sudhir Phadke Movie: गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके (Swaragandharva Sudhir Phadke Movie) यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका सुनील बर्वे साकारत असून त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. तर ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत.  दरम्यान आता या चित्रपटात बाबूजींच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री विभावरी देशपांडेने साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

विभावरी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटातील तिचा फोटो शेअर करत लिहिले की, आज १ मे, महाराष्ट्र दिनी, सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे निर्मित आणि योगेश देशपांडे लिखित दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ह्यात पाहुणी कलाकार म्हणून बाबूजींच्या आईची लहानशी भूमिका मी केली आहे. त्यांच्या अफाट कार्याला माझा हा सादर नमस्कार.

तिने पुढे म्हटले की, तुम्ही सगळे ह्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यालंच. योगेशचे मनापासून आभार. आणि सगळ्या कलाकार - तंत्रज्ञ समूहाचं अभिनंदन आणि शुभेच्छा. 

चित्रपटाबद्दल...सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.