कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील एक गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे. ते गाणे आहे नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्ग्यांचं म्हणणं तरी काय? या गाण्यात अभिनेते अशोक सराफ आपल्या रुसलेल्या भाचीला म्हणजेच छकुलीला समजावताना दिसत आहेत. हे गाणे आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात.
कळत नकळत या चित्रपटातील ती चिमुरडी आता मोठी झाली असून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही. या चित्रपटात छकुलीची भूमिका मृण्मयी चांदोरकर हिने साकारली आहे.
त्यांची मुलगी स्वाती चांदोरकर या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे.
एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे.