Join us

'कुर्रर्रर्रर्र' नाटकातून नम्रता-प्रसादची एक्झिट; त्यांच्या जागी आता दिसणार 'ही' जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:39 IST

Kurrrr: विशाखाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नाटकातून नम्रता आणि प्रसादने एक्झिट घेतल्याचं सांगितलं आहे.

सध्या मालिका आणि सिनेमांप्रमाणेच नाटकांचीही जोरदार चर्चा होत आहे. प्रेक्षकवर्ग आता मोठ्या संख्येने रंगमंचाकडे वळू लागला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात अनेक नाटक गाजताना दिसत आहेत. यामध्येच अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) हिच्या 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. नाटाकातून अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambhrao) आणि प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांनी एक्झिट घेतली आहे.

उत्तम अभिनेत्री असलेल्या विशाखाने 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे हे नाटक रंगमंचावर चांगलं गाजतदेखील आहे. मात्र, नाटक चर्चिलं जात असतानाच अचानकपणे त्यातून नम्रता आणि प्रसादने एक्झिट घेतली. त्यामुळे आता त्यांच्या जागी या नाटकात दोन नव्या कलाकरांची एन्ट्री झाली आहे. याविषयी विशाखाने स्वत: माहिती दिली आहे.

विशाखा सुभेदार निर्मित या नाटकात नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद खांडेकर आणि विशाखा ही कलाकार मंडळी होती. परंतु, आता नम्रता, प्रसादने एक्झिट घेतल्यामुळे त्यांच्याजागी अभिनेत्री मयुरा रानडे व अभिनेता प्रियदर्शन जाधव ही जोडी झळकणार आहे.

“कुर्रर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर आणि नम्रता आवटे संभेराव यांची एक्झिट. पहा कोणते दोन कलाकार प्रेक्षकांच्या कानात कुर्रर्रर्रर्र करण्यासाठी सज्ज आहेत? असं म्हणत विशाखाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. सोबतच आता या नाटकात मयुरा आणि प्रियदर्शन झळकणार असल्याचंही स्पष्ट केलं.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावटेलिव्हिजननाटक