Join us

अशोक सराफ यांना मारायला धावले होते लोक, नाना पाटेकर यांनी वाचवला होता त्यांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 19:29 IST

एकदा जमावाकडून मार खाण्यापासून नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांना वाचवले होते. अशोक सराफ यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते.

ठळक मुद्देनाना आणि अशोक सराफ सराफ यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण त्यांची खरी मैत्री फुलली ती हमीदाबाईची कोठी या नाटकाच्या दरम्यान.

नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे अभिनयाच्या क्षेत्रातील दोन दिग्गज आहेत. त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण ते दोघे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. एवढेच नव्हे तर एकदा जमावाकडून मार खाण्यापासून नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांना वाचवले होते. अशोक सराफ यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते.

अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, एका नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याने लोक अक्षरशः मला मारण्यासाठी धावले होते. त्यावेळी "थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारून आम्ही पळालो होतो. मला पकडून नाना धावला होता. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते याचा विचार देखील मला करवत नाही. 

नाना आणि अशोक सराफ सराफ यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण त्यांची खरी मैत्री फुलली ती हमीदाबाईची कोठी या नाटकाच्या दरम्यान. या नाटकाच्या दरम्यान आम्ही जवऴजवळ आठ महिने एकत्र होतो. त्यावेळी आमच्यात खूप चांगली मैत्री निर्माण झाली. आमची मैत्री आजपर्यंत आहे असे अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

टॅग्स :अशोक सराफनाना पाटेकर