नानांनी लावले माधुरीच्या शर्टचे बटण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 3:31 PM
नाना पाटेकर यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावाचे प्रत्यय अनेक जणांना आलेच असेल. कोणालाही न घाबरता आणि कोणाचीही पर्वा न करणारे बिनधास्त ...
नाना पाटेकर यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावाचे प्रत्यय अनेक जणांना आलेच असेल. कोणालाही न घाबरता आणि कोणाचीही पर्वा न करणारे बिनधास्त नाना नेहमीच त्यांना पटेल त्या गोष्टी करण्यात मश्गुल असतात. नानांनी असेच काही केले होते धकधक गर्ल माधुली दिक्षित सोबत. त्याचे झाले असे की, प्रहार चित्रपटाच्या सेटवर काही पत्रकार आले होते. नाना पाटेकर मात्र सेटवर पत्रकार आहेत वगैरेचा दबाव घेत नाही अथवा आपले वागणेही बदलत नाही. त्या दिवशीही अगदी तसेच घडले. डिंपल कापडिया व माधुरी दीक्षित यांच्यावर तो काही दृश्ये चित्रीत करीत होता. अशातच त्याच्या लक्षात आले, की माधुरीच्या सदरा टाईप शटार्चे वरचे बटण उघडे आहे. नाना पाटेकरमधला स्पष्टवक्तेपणा जागा झाला. पत्रकारांसमोरच नानाने पुढे होत माधुरीचे ते बटण लावले व म्हणाला, माधुरी तुला हे असे वागणे शोभत नाही. तू कसे व्यवस्थित असायला हवे.. असे म्हणतच तो पुन्हा दिग्दर्शनात शिरला. 'प्रहार'च्या शूटिंग कव्हरेजमधे हा क्षण अधिक प्रमाणात गाजला. याच 'प्रहार'च्या प्रीमियरला त्याने तात्कालिक संरक्षण मंत्री शरद पवार यांना लिबर्टीत आमंत्रित केले. चित्रपटाच्या थीमशी हे सुसंगत आहे असे नानाचे मत होते. चित्रपटाला मात्र तात्कालिक समीक्षक व प्रेक्षक या दोघांकडूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्याला दिग्दर्शनासाठी एकही चित्रपट मिळालेला नाही. अधूनमधून तो एखाद्या मराठी वा हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अशी बातमी येते व जाते. प्रत्यक्षात काहीच घडत नाही.