२०११ साली कसाबने केलेला गोळीबार लोकं अजूनहि विसरलेली नाहीत. ह्यावर बरीच चित्रपट निर्मितीहि झाली आहे. अतिरेकी हल्ले बोर्डरवर होत असतात. असाच कधीतरी हल्ला परत होईल अशी शंका, भीती लोकांना सतत वाटत असते.पण शो मस्ट गो ऑन त्याप्रमाणे या प्रत्येक लोकांचे व्यवहावर व्यवस्थित चालू असतात. त्यात कधीही खंड पडत नाही, असाच एक गावातला छोटा मुलगा, शिकून खूप मोठं व्हाव अस स्वप्न उराशी बाळगतो. पण शाळेची पुस्तके, कपडे मुंबईतूनच आणायचे हा हट्ट, पण ह्या हट्टामुळे तो सर्वस्व गमावतो. पण शिक्षणाचे वेड त्याला शांत बसू देत नाही. अशी संवेदनशील पण आताच्या काळात शिक्षित होणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा पटवून देणारा " नऱ्या " हा चित्रपट शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ब्लु स्काय मुव्ही प्रेझेंट्स " नऱ्या " या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक जालिंदर खंडागळे आहेत व चित्रपटाची कथा त्यांनी स्वतः केले आहे.
" नऱ्या "या चित्रपटाची कथा हि काल्पनिक असली तरी दिग्दर्शक जालिंदर खंडागळे यांनी खेडेगावातील मुलांना मुंबईचे आकर्षण किती आहे. मुंबईत येऊन शिक्षण, नोकरी, धंदा करण्याची स्वप्ने त्यांना किती आकर्षित करून घेतात. हि सत्य परिस्तिथी आपल्या " नऱ्या "ह्या चित्रपटात चित्रित केली आहे. बऱ्याच अनुभवी दिग्दर्शकांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनुभव घेतल्यानंतर जालिंदरजी यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याचे धाडस केले. माझा चित्रपटात संपूर्ण टीम, कलाकार, तंत्रज्ञ सर्व नवीन होते. पण प्रत्येकाने यात मोलाची भूमिका निभावली आहे. पटकथा व सवांद लक्ष्मण गुरव ह्यांनी लिहिली आहेत.गीतकार गुलराज ह्यांनी लिहिलेल्या दोन गीतांना संगीतकार श्रीहरी वझे ह्यांनी संगीत दिले आहे व स्विकार शिरगावकर या गायकाने आवाज दिला आहे. डी.ओ.पी श्याम कांबळे, संकलन अजित देवळे, नृत्य अनिल गाडे यांचे आहेत व कार्यकारी निर्माती म्हणून मीरा खंडागळे यांनी काम पाहिले आहे.
" नऱ्या "ह्या चित्रपटात लक्ष्मण गुरव, अंजू गुरव, आकांक्षी पिंगळे, मानसी कुलपे, अस्मित व्यवहारे, श्रेयश बोडके, संध्या वेल्हाळ, विजय वीर, भाग्यश्री कापुरे, शीतल बोऱ्हाडे, सुनंदा सांडभोर ह्यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. शिक्षणाचे महत्व किती आहे हे पटवून देणारा " नऱ्या " प्रत्येकाने आवर्जून पहावा असे निर्माते व नऱ्याच्या टीमने आव्हान केले आहे.