कुणी घर देता का घर?, असं म्हणत हतबल होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आणि आपलं गतवैभव शोधणाऱ्या महान कलाकाराची शोकांतिका मांडणारी कलाकृती म्हणजे नटसम्राट. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकातल्या गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तीरेखा नाट्यरसिकांना भावली आणि या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे.
याच नाटकावर आधारित 'नटसम्राट' हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरला. या नाटकात नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली. नटसम्राट’ या सिनेमात नेहा पेंडसे, सुनील बर्वे, विक्रम गोखले, नाना पाटेकर यांच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाली होती.सिनेमातील सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या अगदी त्याचप्रमाणे अप्पा बेलवलकरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकल्या होत्या अभिनेत्री मेधा मांजरेकर. 'नटसम्राट' सिनेमा महेश मांजरेकर यांनीच दिग्दर्शिक केला होता.
कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे मेधा मांजेकर यांनीह रसिकांची मने जिंकली आहेत. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे त्यांचा ऑफस्क्रीन लूकलाही चाहते नेहमीच पसंती देत असतात.
महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील खास जोड्यांपैकी एक आहे. महेश आणि मेधा बंध नायलॉनचे या सिनेमात त्यांनी एकत्र कामही केले होते. ऑनस्क्रीन दोघांची केमिस्ट्रीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. खऱ्या आयुष्यात त्यांची पहिली भेट सुमारे 20 वर्षांपूर्वी झाली होती. तीही महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून मेधा यांना भेटले होते.
पहिल्याच भेटीत महेश मांजरेकर मेधा यांच्या प्रेमात पडले आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. नंतर सोबत संसार थाटला. मेधा आणि महेश मांजरेकर यांची सई मांजरेकर ही मुलगी आहे. सईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या सिनेमातून आपला बॉलिवूड डेब्यू केला होता.