कोरोना व्हायरसने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. कोरोनाचा भारतात पहिला बळी गुरुवारी गेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः गर्दीचे ठिकाणांवर कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्यामुळे थिएटर, मॉल, मंदिरं अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेचे 100वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ कांबळीने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 25 मार्च रोजी होणारे नाट्य संमेलन आता 14 जून 2020 या कलावधीत होणार आहे. अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आली आहे. सुबोध भावेने देखील काही दिवसांपूर्वीच 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचा अमेरिकेतील दौरा रद्द केला होता.
नाट्य संमेलनाने घेतली Coronaची धास्ती; घेतला हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:14 PM