नवाझ सिद्दीकीने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:16 PM2018-06-30T17:16:47+5:302018-06-30T17:19:31+5:30
दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित या आगळ्या वेगळ्या 'ड्राय डे'ची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले आहेत.
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने 'ड्राय डे' सिनेमासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या.तसेच या सिनेमाच्या ट्रेलरची लिंकदेखील त्याने आपल्या ट्वीटरवर पोस्ट केली असल्यामुळे, 'ड्राय डे' बाबत सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.सुपरहिट गाण्यांचा तडका आणि तरुण कलाकारांचा ताफा असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, मोनालिसा बागल, आयली घिए, सानिका मुतालिक हे नवोदित कलाकार आपल्याला पाहता येणार आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित या आगळ्या वेगळ्या 'ड्राय डे'ची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले आहेत.
प्रेमाची नशा 'ड्राय डे' या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'ड्राय डे' या सिनेमातील 'अशी कशी' हे रोमँटिक गाणे सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले. हे गाणे लाँच झाल्यानंतर काहीच तासात प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया या गाण्याला मिळत आहेत. प्रेमाच्या दुनियेची रंगीत सफर या गाण्यातून घडून येत आहे. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. नव्याने प्रेमात पडलेल्या युगुलांना हे गाणे आपलेसे करीत आहे. जय अत्रे लिखित या गाण्याला हिंदीचे सुप्रसिद्ध गायक जोनीता गांधी आणि अॅश किंग यांचा गोड आवाज लाभला आहे. जोनीता आणि अॅश यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. पण मराठी चित्रपटात गाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या दोघांनी हे गाणे खूपच चांगल्या प्रकारे गायले आहे. शिवाय या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी झाले असून श्रीनगरच्या आल्हाददायी निसर्गाचा अनुभव या गाण्यातून रसिकांना घरबसल्या घेता येणार आहे.