Join us

हॉट फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या या मराठी अभिनेत्रीने शेअर केला नो-मेकअप लूकमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 11:38 IST

मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अ‍ॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्री इन्स्टाग्राम तिचा नो-मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत नेहाने एक कॅप्शनदेखील दिले आहे. नेहा लिहिते, इन्स्टाग्रामवरुन मी दोन दिवसांचा छोट्यासा ब्रेक घेतेय. नेहाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते.

 

टॅग्स :नेहा महाजन