Join us  

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरेची धमाल! 'एक डाव भुताचा' टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:57 PM

मकरंद आणि सिद्धार्थसोबतच अभिनेत्री मयूरी देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Ek Daav Bhootacha : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मकरंद अनासपुरे ( Makrand Anaspure) ही जोडी एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर मकरंद यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले, तर सिद्धार्थच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. आता ही जोडगोळी दमदार आणि उत्कंटावर्धक चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. 'एक डाव भुताचा' असे चित्रपटाचे नाव असून सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

'एक डाव भुताचा' हा चित्रपट येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. धमाकेदार टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात नेमकं काय-काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मकरंद आणि सिद्धार्थसोबतच अभिनेत्री मयूरी देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिले आहे.  या जोडीने आजवर साडे माडे तीन, उलाढाल, दे धक्का , दे धक्का २, शासन अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय.  प्रेक्षकांना ही जोडी एकत्र पाहण्याची इच्छा होती. आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.  

टॅग्स :मकरंद अनासपुरेसिद्धार्थ जाधवमयुरी देशमुखमराठी चित्रपट