Join us

गश्मीर महाजनीच्या आयुष्यात आला नवा पाहुणा, पिता बनल्यानंतर घेतला हा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 08:00 IST

लवकरच गश्मीर रंगभूमीवर झळकणार आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. 

अभिनेता गश्मीर महाजनी आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गश्मीर आणि त्याची पत्नी गौरी देशमुख यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे. गश्मीरची पत्नी गौरीने २१ डिसेंबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आपल्या या लाडक्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून गश्मीरने ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि पिता झाल्याच्या भावनेने गश्मीर फारच भावुक झाला आहे. पिता झाल्यामुळे जबाबदारी आणखी वाढल्याचंही तो म्हणतो. सोशल मीडियावर आपल्या लेकाचा हा पहिला आणि अखेरचा फोटो असल्याचे त्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. प्रसिद्धी आणि झगमगाटाच्या दुनियेपासून दूर राहून आपल्या लेकाने त्याचे बालपण एन्जॉय करावं असं त्याला वाटतं.

 

यानंतर आपला लेकच स्वतः समजदार आणि प्रौढ झाल्यानंतर स्वतःचा चा फोटो सोशल मीडियावर शेअर करेल असंही गश्मीरने सांगितले आहे. हा निर्णय खूप विचार करून घेतल्याचंही त्याने सांगितले आहे. आपण आपल्या जीवनात खूश असल्याचेही त्याने म्हटलं आहे. जीवनात बाळाचं आगमन झाले आहे, जीवापाड प्रेम करणारी पत्नी आहे, मुंबईत स्वतःचं घर आहे आणि करिअरही योग्य दिशेने सुरू आहे असं सांगत त्याने आपण आनंदी तसंच समाधानी असल्याचे म्हटले आहे. लवकरच गश्मीर रंगभूमीवर झळकणार आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. 

 

टॅग्स :गश्मिर महाजनी