Join us

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..., 'दे धक्का २'चं नवं मोशन पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:52 IST

De Dhakka 2:'दे धक्का 2'मध्ये पहिल्या दे धक्का प्रमाणेच तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे

सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला "दे धक्का" सुमारे 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद चित्रपटाला मिळाला होता . दे धक्का चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मना मध्ये विशेष स्थान मिळवले होते आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे , येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी दे धक्का २ रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर यांच्या ए व्ही के एंटरटेनेंट आणि यतीन जाधव यांच्या स्काय लिंक एंटरटेनेंट या  बॅनर्स खाली केली आहे.  निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ एम. पटेल यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. 

 दे धक्का 2 मध्ये पहिल्या दे धक्का प्रमाणेच स्टारकास्ट आहे . शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि सिक्वेलमध्ये संजय खापरे, गौरी इंगवले, प्रवीण विठ्ठल तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरे असे बरेच कलाकार या चित्रपटात आहेत . दे धक्का चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार या चित्रपटातही दिसणार आहेत.

 फक्त सायलीच्या भूमिकेत गौरी इंगवले दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये हे कलाकार इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धमालमस्ती करताना दिसणार आहेत. यापूर्वी दे धक्का चित्रपटानेही रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवले होते. त्या चित्रपटातील बरेच संवाद प्रेक्षकांच्या मनावर कायमचे कोरले गेले होते. त्यामुळे आता दे धक्का २ च्या माध्यमातून हे कलाकार विनोदाचा कसा धक्का देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर शिवाजी साटमप्रवीण तरडे