Join us

दिग्दर्शक संजय जाधव यांचा नवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 5:20 AM

संजय जाधव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. ज्यांच्या नावापुढचं वलय वेगळंच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर असलेल्या संजय जाधव ...

संजय जाधव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. ज्यांच्या नावापुढचं वलय वेगळंच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर असलेल्या संजय जाधव यांची बातच काही न्यारी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तो जे काही करतो ते त्यात काही नाविन्य असतचं.त्यामुळेच संजय जाधव, यांनी सिनेमा प्रेमींना अभिनयासाठी आपली आवड शोधण्याची आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची एक संधी योजली आहे व त्यानुसार एक मंच उपलब्ध करून दिला आहे.‘ड्रीमिंग डिजिटल फिल्म इन्स्टिट्यूट’ या त्यांच्या नवीन उपक्रमात, फिल्म-मेकिंगमध्ये डिप्लोमा कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सुरुवात म्हणून, त्यांनी अभिनयावर एक मोफत कार्यशाळा करण्याचं योजलं आहे, ज्यात मर्यादित जागा असून ते २५ मार्च २०१८, रविवार, रोजी आयोजित केले जाईल.या कार्यशाळेत आपल्याला सर्वोत्तम पाठिंबा देण्यासाठी,सिनेसृष्टीतील व्यावसायिकांकडून भाग घेतला जाईल.रुपेरी पडद्यावरील मैत्रीची गोष्ट सांगणारी दुनियादारी रसिकांना चांगलीच भावली होती.संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' या सिनेमाच्या कथेने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं होतं.अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर,अभिनेता अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी,उर्मिला कोठारे यांच्या अभिनयानं सिनेमा सिनेमाच्या कथेला वेगळं परिमाण मिळवून दिलं होतं. स्वप्नीलनं साकारलेला श्रेयस आणि अंकुश चौधरीनं साकारलेली डीसीपी या भूमिकेनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं होतं.जितेंद्र जोशीची निगेटिव्ह शेडची भूमिका तसंच सई, उर्मिलाच्या अभिनयानं सिनेमाला चारचाँद लावले.प्रत्येक कलाकाराची भूमिका रसिकांना आपलीशी वाटू लागली. सिनेमातील कलाकारांची भूमिका आणि त्याचे डायलॉग्स रसिकांच्या ओठावर आजही सहज रुळतात.त्यामुळेच की काय आता पुन्हा एकदा दुनियादारीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.दुनियादारी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.टीम दुनियादारी रिअलमध्येही खूप चांगले मित्र मैत्रिण आहेत.त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यात फारसं काही वेगळं वाटणार नाही.मात्र या फोटोतील त्यांनी दिलेली पोझ आणि लूक काही तरी नक्कीच सांगतंय. या चौघांमध्ये किंवा टीम दुनियादारीमध्ये नक्कीच काही तरी शिजतंय असंही म्हटल्यास वावगं ठरु नये.