Join us

वेबच्या रणांगणात निखिल चव्हाणची बाजी, आणखी एक वेब फिल्म वीरगती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 8:00 AM

निखिलची अलीकडेच 'स्त्रीलिंग पुल्लिंग' ही वेबसिरीजची प्रदर्शित झाली. या वेबसीरिजची चर्चा सध्या चांगलीच रंगली असताना, त्याची आणखी एक वेब फिल्म लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.

ठळक मुद्दे'वीरगती' ही वेब फिल्म प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

देशभक्तीने नुसतेच भारावून न जाता हाती तिरंगा घेऊन वीरगती पत्करणाऱ्या 'लागीरं झालं जी' मालिकेमधील 'फौजी विक्रम'च्या व्यक्तिरेखेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड लोकप्रियता दिली. फौजी विक्रम उर्फ विक्या उर्फ निखिल चव्हाण या गुणी कलावंताचा सुरु झालेला अभिनय क्षेत्रातील हा प्रवास त्याने साकारलेल्या भूमिके इतकाच रोमांचकारी आहे. निखिलची अलीकडेच 'स्त्रीलिंग पुल्लिंग' ही वेबसिरीजची प्रदर्शित झाली. या वेबसीरिजची चर्चा सध्या चांगलीच रंगली असताना, त्याची आणखी एक वेब फिल्म लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. झी ५ ओरिजनल  प्रस्तुत 'वीरगती' या सत्यकथेवर आधारित वेब फिल्म मधून निखिल आपल्याला एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.    

अभिराम भडकमकर ह्यांची गोष्ट आहे तर इर्फान मुजावर आणि ऋषिकेश तुराई चे संवाद लेखन आहे, राजू देसाई आणि विशाल देसाई दिग्दर्शित 'वीरगती' ही वेब फिल्म प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला प्रेक्षकांना पाहता येईल. निखिलने आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये आपलं सर्वस्व झोकून देऊन काम केलं. भूमिकेची लांबी ना मोजता भूमिकेची खोली जाणून घेतली म्हणूनच त्याने साकारलेल्या छोट्या-छोट्या भूमिकाही विशेष लक्षणीय ठरल्या.

नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज असा चौफेर वावर असणाऱ्या निखिलला झी ५ ओरिजनल फिल्म्सद्वारा एक सुवर्णसंधी चालून आली ती म्हणजे 'वीरगती'तील आर्मी ऑफिसर 'लेफ्टनंट सलीम शेख' या व्यक्तिरेखेद्वारा.  या वेब फिल्ममध्ये निखिल मुख्य भूमिकेत दिसणार असून आर्मी ऑफिसर सलीम शेखला सुद्धा केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून उदंड प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

टॅग्स :निखील चव्हाण