Join us

अभिनेता अशोक शिंदे यांना ‘निळू फुले स्मृती’ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 07:15 IST

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकरी सदन सभागृहामध्ये ८ जानेवारीला शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

मुंबई : नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवलेले अभिनेते अशोक शिंदे यांना ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अशोक शिंदे यांनी आजवर नायक आणि सहनायकासह खलनायकाची व्यक्तिरेखाही साकारली आहे. 

सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशनतर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. यंदाचा सांस्कृतिक पुरस्कार अभिनेते अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे. शिंदे यांनी आजवर २२५ चित्रपट, १५० मालिका आणि ५० पेक्षा अधिक नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे. 

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकरी सदन सभागृहामध्ये ८ जानेवारीला शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. नटश्रेष्ठ निळू फुले या महान कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही गौरवाची गोष्ट असून, अशा पुरस्कारांमुळे काम करायला बळ मिळत असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :अशोक शिंदे